>> काश्मीर फाईल्ससह ३ भारतीय चित्रपट स्पर्धेत
येत्या २० नोव्हेंबरपासून सुरू होणार्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी एकूण १५ चित्रपटांची निवड झाली आहे. त्यात १२ आंतरराष्ट्रीय चित्रपट व ३ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
सुवर्ण मयुर पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत असलेल्या ३ भारतीय चित्रपटांमध्ये ‘काश्मीर फाईल्स’ या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावरील चित्रपटाचाही समावेश आहे. तसेच दी स्टोरी टेलर आणि कुरुंगु पेडल हे अन्य दोन चित्रपटही स्पर्धेत आहेत.
५३ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबर रोजी सुरू होत असून, त्याचा समारोप २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी काल पणजीत इफ्फीच्या तयारीचा आढावा घेतला. हा चित्रपट महोत्सव ‘कान्स’ चित्रपट महोत्सवाच्या तोडीचा होईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे मुरुगन यांनी आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले.