सुरक्षा रक्षकांना वेतनवाढ मिळणार : साळकर

0
97

गोवा भरती व रोजगार सोसायटीमार्फत आरोग्य खात्याच्या विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रांमध्ये व हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या सुरक्षा रक्षकांना नोव्हेंबर २०१४ पासून सरकारच्या दि. २१-८-२०१३ च्या परिपत्रकानुसार वाढीव पगार मिळणार आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन सुभाष साळकर यांनी दिली आहे.सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढीसंबंधी, गोवा भरती व रोजगार सोसायटीच्या या प्रयत्नांना यश आले असून आरोग्य खात्याने दि. २७ नोव्हेेंबरला पत्र पाठवून सोसायटीला याची माहिती दिली आहे. सोसायटीमार्फत राज्यातील सरकारच्या विविध केंद्रांमध्ये व हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या जवळजवळ ५०० सुरक्षा रक्षकांना याचा फायदा मिळणार आहे. यामुळे महिन्याला मिळणार्‍या रु. ४९५० पगारा ऐवजी त्यांना आता रु. ७१२४ मिळणार आहेत, त्याशिवाय रु. १९२४ त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर दरवर्षी ठराविक वार्षिक पगारवाढ मिळणार आहे.
आरोग्याखात्या व्यतिरिक्त अन्य सरकारी कार्यालयांमध्ये काम करणार्‍या सुरक्षा रक्षकांनाही याचा फायदा मिळावा म्हणून दि. २१ ऑगस्ट २०१३च्या परिपत्रकामध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. पार्सेकर यांनी सचिवालयातील संबंधित अधिकार्‍यांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढीची सोसायटीने दोन वषार्र्ंपासून लावून धरलेली मागणी सरकारने मान्य केली आहे, असे सुभाष साळकर यांनी पुढे सांगितले.
तसेच सोसायटीमार्फत काम करणार्‍या जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामध्ये कायमचे सामावून घेण्यासाठी महामंडळाने दि. ०३ डिसेेंबर २०१४ रोजी ५०० सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी सोसायटीतील सुरक्षा रक्षकासाठी वयाची मर्यादा ३०+१० वर्षे व शिक्षणाची मर्यादा इ. सहावी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वय किंवा अन्य कारणामुळे ज्यांची निवड होऊ शकणार नाही त्यांना महामंडळामार्फत अन्य प्रकारच्या सेवेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. महामंडळाच्या या जागांसाठी अर्जाचे फॉर्म्स सोसायटीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. फॉर्म्स योग्यप्रकारे भरून महामंडळाच्या कार्यालयात दि. ०५-०१-२०१५ पूर्वी द्यावेत असे आवाहन सुभाष साळकर यांनी केले आहे. पगारवाढ व नोकरीमध्ये सुरक्षितता याचे आश्‍वासन गोवा भरती व रोजगार सोसायटीने या सुरक्षा रक्षकांना दोन वषार्र्ंपूर्वी दिले होते, त्याची पूर्तता सोसायटीने केली आहे, याचा फायदा या सुरक्षा रक्षकांनी करून घ्यावा असे आवाहन सोसायटीचे चेअरमन सुभाष साळकर यांनी केले आहे.