सुभाष वेलिंगकरांची 3 तास चौकशी

0
6

>> दुसऱ्या दिवशी देखील डिचोली पोलीस ठाण्यात लावली हजेरी

गोव्यातील राष्ट्रीय सेवक संघाचे माजी संघचालक तथा प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांना काल पुन्हा डिचोली पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहिले. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने शुक्रवारी सकाळी 10 वाजता ते पोलीस ठाण्यात हजर झाले. यादरम्यान 3 तास त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयाकडून वेलिंगकर यांना मोठा दिलासा मिळाला होता. वेलिंगकरांनी तपासात सहकार्य केल्यास त्यांना अटक करू नये, असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी डिचोली पोलीस स्थानकात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला. चौकशी झाल्यानंतर अर्ध्या तासात ते माघारी परतले होते. तसेच त्यांना शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती.
त्यानुसार काल पुन्हा वेलिंगकर हे पोलीस स्थानकात सुमारे तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली व त्याला पूर्ण सहकार्य केले.

चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना सुभाष वेलिंगकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची हमी आपण दिलेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयातच काय ते ठरेल. तूर्त आपण कोणतेच भाष्य करणार नाही, असे वेलिंगकर यांनी पत्रकारांना सांगितले. ज्या ज्या वेळी पोलीस बोलवतील, त्या त्या वेळी आपण चौकशीसाठी त्यांना पूर्ण सहकार्य करू, असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.