सुभाष फळदेसाई यांची उपसभापतीपदी निवड

0
27

गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काल सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांची निवड करण्यात आली. कॉंग्रेसचे आमदार केदार नाईक यांचा त्यांनी २४ विरुद्ध १५ मतांनी पराभव केला. काल दुपारच्या सत्रात ही निवडणूक झाली. सुभाष फळदेसाई यांची उपसभापदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व विरोधी पक्षातील सर्वांत ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी त्यांना त्यांच्या आसनावर नेऊन बसवले. या पदासाठी अर्ज भरलेले अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सुभाष फळदेसाई व केदार नाईक यांच्यात निवडणूक झाली.