सुनील गुडलरच्या घरावर छापा

0
94

भ्रष्टाचार विरोधी कायद्याखालील विशेष न्यायाधिशांच्या आदेशानुसार काल भ्रष्टाचारविरोधी पोलीस पथकाचे निरीक्षक नोलोस्को रापोस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निलंबीत पोलीस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांच्या सांताक्रुझ येथील निवासस्थानी छापा घालून लॅपटॉप, मोबाईल, अन्य महत्वाचे दाखले जप्त करून चौकशी सुरू केली आहे. भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी गुडलर याच्याविरुध्द बुधवारी गुन्हा नोंद केला होता. बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप गुडलर याच्यावर होता. ३० सप्टेंबर २००९ ते ३१ डिसेंबर २०१० या काळात त्याने बेकायदेशीर माया जमवल्याचे चौकशीअंती आढळून आले होते. अमलीपदार्थ व्यवहारातील माफिया व पोलिसांचे लागेबांधे त्यामुळे चर्चेत आले होते.