राज्यात गाजलेल्या भाजपच्या हरयाणातील नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित सुधीर पाल सांगवान याला येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल सशर्त जामीन मंजूर केला. गतवर्षी सोनाली फोगट हिचा गोव्यात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबीयाच्या मागणीनुसार या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून, न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.