गोवा सरकारने पाणीपुरवठा (सुधारणा) कायद्याची सुधारित तरतूद अधिसूचित केली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यक्षेत्रातील सहाय्यक अभियंत्यांना बेकायदेशीर घरगुती पाणी वापरासाठी 10 हजार रुपये आणि अर्ध-घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक हेतूंसाठी 50 हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी कायद्याच्या कलम 6 मध्ये सुधारणा केली आहे. जलद आणि वेळेवर कारवाई सुनिश्चित करणे हे या दुरुस्तीचे उद्दिष्ट आहे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे.