>> ढवळीकर बंधूंवर टीका
मगो पक्षाबरोबर शिवसेनेने युती केल्याने आपण सेनेच्या राज्य प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचे सांगून आता पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपसाठी काम करणार असल्याचे सुदीप ताम्हणकर यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा ढवळीकर बंधूंची मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्याचा निर्णय योग्यच होता, असे सांगून ढवळीकर बंधू हे सरकारला लागलेले ग्रहण होते, असे ते म्हणाले. शिवसेना आता सर्वसामान्यांचा विचार करीत नाही. उच्च वर्णियांनाच प्राधान्य देते. त्यामुळे आपण कंटाळलो होतो, असे ताम्हणकर यांनी सांगितले. पार्सेकर पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.