सुदिन ढवळीकरांनी घेतल केंद्रीय वीजमंत्र्यांची भेट

0
22

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग यांचीे नवी दिल्ली येथे काल भेट घेऊन राज्यातील विजेसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी गोव्याला वीज व्यवस्थेत सुधारणांसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन सिंग यांनी दिले.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने तसेच राज्याचा भौगोलिक व पर्यावरणाचा समतोल लक्षात घेऊन वीज सुधारणा योजनांचा विशेष विचार करण्याची विनंती ढवळीकर यांनी केली. तसेच दक्षिण व उत्तर गोव्यात नवीन वीज उपकेंद्र आणि वीज व्यवस्थेत सुधारणांसाठी आर्थिक साहाय्याची मागणी ढवळीकरांनी केली.