सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार

0
3

पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर काल एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यातून ते अगदी थोडक्यात बचावले. या गोळीबाराच्या घटनेनंतर लोकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले.
सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी सोमवारी बादल यांना ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) ठोठावली होती. या शिक्षेचा एक भाग म्हणून सुखबीर बादल हे सुवर्ण मंदिराच्या दरबार साहिबच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणून काम करत होते.