सुकूर येथील सभेत सरकारच्या कृतीचा निषेध

0
120

>> समर्थकांचा खंवटेना पाठिंबा

माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना अटक केल्या प्रकरणी पर्वरी मतदारसंघात वातावरण तापले असून या कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी निषेध सभा घेत पाठिंबा व्यक्त केला आहे.

काल सकाळी धोनवाडा, सुकूर येथील श्री वेताळ चावडेश्वर देवस्थानच्या प्रांगणात आयोजित निषेध सभेत सुमारे पाचशेपेक्षा जास्त खंवटे समर्थकांनी सरकार आणि सभापतींचा निषेध केला.
यावेळी साल्वादोर दु मुंदचे सरपंच संदीप साळगावकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच गुरुनाथ वेर्णेकर जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक, वैशाली सातर्डेकर, बिठ्ठोण व्हिलेजर्स फ्रंटचे अध्यक्ष आग्नेल परेरा, सुरज बोरकर, तिन्ही पंचायतींचे पंचसदस्य आणि मोठ्या संख्येने खंवटे समर्थक उपस्थित होते.