सुकूरमध्ये रविवारी रात्री उशिरा दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक बसून एका 31 वर्षीय दुचाकीचालकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. मृत तरुणाचे नाव राहुल खलप (रा. सुकूर) असे आहे.
पर्वरी पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल खलप हा आपल्या केटीएम दुचाकी (क्र. जीए-03-एएन-7029) वरून भरधाव वेगाने जात असताना त्याच्या दुचाकीची धडक रितेश कांबळी यांच्या हिरो होंडा दुचाकीला समोरासमोर बसली. त्यात राहुल याचा मृत्यू झाला, तर रितेश कांबळी (46) हे जखमी झाले. रविवारी मध्यरात्री गोमेकॉमधून पर्वरी पोलीस स्थानकात दूरध्वनीद्वारे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात राहुल खलप तरुणाचा मृतदेह आणण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच रितेश कांबळी याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.