केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा २६ एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्याच्या बोर्डाप्रमाणे या परीक्षा देखील ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
कोरोनामुळे सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सत्र १ आणि २ मध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. सीबीएसईची इयत्ता दहावी आणि बारावीची पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान घेण्यात आली. सीबीएसईने अद्याप दोन्ही इयत्तांच्या पहिल्या सत्र परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत, ते लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.