सीबीआय निवड समितीतील ‘विरोधी पक्ष नेता’ हा उल्लेख काढून ‘विरोधी बाकांवरील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता’ असा बदल करणारे दुरुस्ती विधेयक काल संसदेत संमत करण्यात आले. दिल्ली स्पेशल पोलीस इस्टाब्लिशमेंट (दुरुस्ती) विधेयक २०१४, लोकसभेत बुधवारी संमत झाले होते. काल राज्यसभेत, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आश्वासनानंतर, ते संमत झाले. सीबीआय प्रमुखांची निवड ही एकमताने असेल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी सभागृहाला दिले. सध्याचे सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांचा कालावधी दि. २ डिसेंबर रोजी संपत असल्याने, या विधेयकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.