‘सीझेडएमपी’मध्ये दुरुस्त्यांना सुरुवात

0
12

राज्याच्या किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) 2011 मध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण खात्याचे संचालक जॉन्सन फर्नांडिस यांनी दिली. चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) या संस्थेने राज्याचा सीझेडएमपी 2011 तयार केला आहे. राज्य सरकारने हा सीझेडएमपी 2011 आराखडा अधिसूचित केला आहे. पर्यावरण खात्याने या आराखड्याचे नकाशे सादर करण्याची सूचना एनसीएससीएमला केली होती. या नकाशांचा अभ्यास केल्यानंतर आराखड्यात जमिनीचा काही भाग, बंधारे चुकीच्या पद्धतीने अधिसूचित झाल्याचे आढळून आले. त्यामुळे चुकांची दुरुस्ती करण्यासाठी एनसीएससीएम या संस्थेकडे एक अर्ज सादर करून आवश्यक दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.