सीएए : कॉंग्रेसकडून चिथावणीचे काम : मोदी

0
173

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला कॉंग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष चिथावणी देत असल्याचा आरोप काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना केला. आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचे काम विरोधी पक्ष करत असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसकडे देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याची कोणतीही दूरदृष्टी नसल्याचा दावा मोदी यांनी केला.