सीएएला मनसेचा पाठिंबा ः राज ठाकरे

0
108

>> मनसेचा मुंबईत महामेळावा

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीलाही आपला पूर्ण पाठिंबा आहे असे सांगत मुंबई येथे झालेल्या मनसेच्या महामेळाव्यात राज ठाकरेंनी
पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही केली. यावेळी राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, यावेळी मनसेच्या झेंड्यातही बदल करण्यात आला असून झेंड्यावरून इंजिन काढण्यात आले असून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा छापण्यात आली आहे.

आपला देश म्हणजे एक धर्मशाळा होऊ पाहत आहे. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारतीय सैन्याला आतल्याच शत्रूंशी आधी लढावे लागेल. त्यामुळे एनआरसीचे नंतर बघू आधी पाकिस्तान सोबतची समझोता एक्सप्रेस आणि बससेवा बंद करा. असेआवाहन करत काश्मीर आणि राम मंदिराचा राग काढण्यासाठीच सीएएला विरोध करणारे मोर्चे काढले जात असल्याची टीका राज यांनी केली.

यावेळी राज यांनी, मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेले नाही, असे सांगतानाच मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर धावून जाईन असा इशारा दिला. यावेळी राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.