सीएएद्वारे पाकिस्तानी नागरिक परेरा यांना भारतीयत्व प्रदान

0
4

सीएए म्हणजेच नागरिकत्त्व (दुरूस्ती) कायद्याखाली काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाकिस्तान देशाचे ख्रिस्ती धर्मीय नागरिक शेन सेबेल्टियान परेरा व त्यांच्या कुटुंबियांना भारतीय नागरिकत्त्व प्रमाणपत्र काल पर्वरी येथे मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात दिले. त्यामुळे सीएए कायद्याखाली गोव्यात भारतीय नागरिकत्त्व मिळवणारे ते दुसरे कुटुंब ठरले आहे.

मूळ पाकिस्तानी नागरिक असलेला शेन हे चार दशकांपूर्वी त्याचा जन्म झाल्यानंतर काही काळानंतर त्यांच्या कुटुंबियांसह भारतात आले होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण गोव्यात घेतलेले आहे.
78 वर्षीय जोजेफ पेरेरा या मूळ गोमंतकीय व नंतर पाकिस्तानी नागरिकत्त्व घेतलेल्या व्यक्तीला गेल्या 28 ऑगस्ट रोजी सीएएखाली भारतीय नागरिकत्त्व बहाल करण्यात आले होते.