सिलिंडर स्फोटामुळे नुवेत ७ लाखांचे नुकसान

0
100

फातेपूर नुवे येथे मारती व्हॅनला बसविलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत मारुती व्हॅनसह, दोन कार व मोटरसायकल जाळून खाक झाली. या दुर्घटनेत चालक जुवांव जुझे आल्मेद (४६) जखमी झाला असून एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मारुती व्हॅन गॅसवर चालत होती. काल दुपारी १ वाजता जुवांव जुझे आल्मेदा मारुती व्हॅन घेऊन चंद्रवाडो येथून आपले नातेवाईक आनास्तियो रॉड्रिग्स यांच्या फातेपूर नुवे येथे गेले होते. दीड वाजता घरी पोहचला व गॅरेजमध्ये गाडी ठेवत असताना, गॅस सिलिंडरचा फोट होऊन आग लागली. त्यात जीए- ०२- एम- १४८५ क्रमांकाची मारुती व्हॅन, गॅरेजमध्ये ठेवलेली जीए- ०८ एफ- ४१८८ ही आय- २०- कायू व जीए- ०२ एम- ४८४७ ही मोटरसायकलला आग लागून नुकसान झाली. तात्काळ मडगाव अग्नीशामक दलाने धाव घेऊन आग विझविली.