सिलिंडर गळतीमुळे नेरुलमध्ये स्फोट

0
23

भाटीवाडा, नेरुल येथील एका घरात सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत सदर घरातील दोघे किरकोळ जखमी झाले. पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल रविवारी (दि. 11) भाटीवाडा नेरुल येथील शिरोडकर कुटुंबियांच्या घरातील सिलिंडर गळतीमुळे स्फोट झाल्याचा संदेश आला. घटनास्थळी पर्वरी पोलीस तसेच पिळर्ण अग्निशामक दलाचे जवान पोचले. त्यांनी त्वरित घरातील सिलिंडरचा रेग्युलेटर बंद केला आणि दोन सिलिंडरतेथून बाहेर काढले.

या स्फोटात शिरोडकर यांची आई आणि मुलगा किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर स्फोट गळतीमुळे झाला असल्याचा निष्कर्ष काढला असून जखमींवर नजीकच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. साहाय्यक उपनिरीक्षक संजीव साळुंके यांनी अपघाताचा पंचनामा केला. या स्फोटामध्ये घराचे नुकसान झाले आहे.