सिलिंग कोसळून 3 विद्यार्थिनी जखमी

0
16

झुआरीनगर येथील एमईएस महाविद्यालयातींल एका वर्गखोलीचे सिलिंग कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी 10.30 वाजता आलेल्या वादळी पावसावेळी वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या वर्गखोलीचा सिलिंगचा भाग कोसळला. यावेळी वर्ग चालू होता. हे सिलिंग वर्गात बसलेल्या तीन मुलींवर कोसळल्याने त्या जखमी झाल्या. त्या भयभीत झाल्याने एका मुलीला चक्कर आली व ती बेशुद्ध पडली. वर्गातील शिक्षकाने विद्यार्थ्यांना बाहेर काढले व जखमी विद्यार्थिनींना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. नंतर त्यांच्यावर उपचार करून घरी पाठण्यात आले.