सिमला येथे बस दरीत कोसळून २१ ठार

0
117

येथून जवळ असलेल्या महामार्गावरील कतारघाटात ४०० मीटर खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात २१ जण ठार झाले तर ५ जण जखमी झाले. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. १९ जणाचे घटनास्थळीच निधन झाले तर दोघांचा इस्पितळात मृत्यू झाला. ड्रायव्हरने बस दरीत कोसळण्याआधी बाहेर उडी मारली. तो जखमी झाला आहे.