सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांना छातीत जंतू संसर्ग झाल्यामुळे येथील कोकिलाबेन अंबानी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी शशी कपूर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. खोकला व श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रविवारी इस्पितळात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.