सिद्धी नाईकच्या मृत्यूचे गूढ कायम

0
89

बार्देश तालुक्यातील नास्नोळा येथील युवती सिद्धी नाईक हिचा कळंगुट किनार्‍यावर विवस्त्र अवस्थेत गुरूवारी मृतदेह सापडला होता. तिचा मृत्यू संशयास्पद असून तिचे कपडे गायब झालेले आहेत. मात्र तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

पोलिसांनी सिद्धी नाईक हिच्या कुटुंबियांकडे अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तिचे जवळचे मित्र मैत्रिणी यांच्याकडून तसेच ती कामाला असलेल्या मॉलमधूनही पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सिद्धी हिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या अंगावरील कपडे गायब कसे झाले असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. बुधवारी म्हापसा पोलीस स्थानकात सिद्धी नाईक बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाली होती. तर तिचा मृतदेह कळंगुट समुद्र किनारी सापडल्याने दुसरी तक्रार कळंगुट पोलिसात नोंद झाली आहे. दोन्ही पोलीस स्थानके तपास करीत आहेत. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

तपासणीसाठी व्हिसेरा पाठवला

सिद्धी नाईक हिच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक अहवालात काहीच आढळून न आल्याने पोलिसांनी व्हिसेरा व अन्य अवयव परराज्यात तपासणीसाठी पाठविले आहेत. सिद्धी हिचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनारी आढळून आला. पोलिसांनी हे प्रक़रण गंभीरपणे घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून एका ज्येष्ठ आयपीएस अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे.