सिद्दिकी खानविरोधात आणखी एक आरोपपत्र

0
4

राज्यातील जमीन बळकाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या खास विभागाने (एसआयटी) काल जमीन बळकाव प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्याविरोधात जमीन बळकावप्रकरणात आणखी एक आरोपपत्र म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले आहे. म्हापसा येथील जमीन बळकावप्रकरणात दुसरे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. यापूर्वी म्हापसा आणि वाळपई येथील प्रथम श्रेणी न्यायालयात जमीन बळकावप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच, जुने गोवा पोलिसांनी सिद्दिकी विरोधात पणजी येथील न्यायालयात पोलीस कोठडीतून पलायनप्रकरणी आरोपपत्र दाखल केलेले आहे.