सिक्कीममध्ये ढगफुटी; पुरामुळे 23 जवानांसह 48 जण बेपत्ता

0
32

सिक्कीममध्ये काल अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. त्यामुळे भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. तसेच 25 नागरिक बेपत्ता झाले आहेत, तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिक्कीममध्ये मंगळवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीची पाण्याची पातळी वाढली. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहणारी ही नदी बांगलादेशात जाते. या नदी क्षेत्रालगतच्या भागात तैनात करण्यात आलेले 23 लष्करी जवान बेपत्ता झाले. त्यांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू असून, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
याशिवाय 25 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिस्ता नदी आलेल्या पुरात बुडून 8 जणांचा मृत्यू झाला.