बुधवारपासून सुरू होणार्या सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेसाठी रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला सोपा ङ्गड्रॉफ लाभला आहे. चीनच्या ही बिंगिजाव हिच्याविरुद्ध ती आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
सध्या जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी असलेल्या सिंधूचा ङ्गअफ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात अकाने यमागुची (जपान), सायाको साटो (जपान) व ही बिंगिजाव यांचा समावेश आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने साखळी फेरी पार पाडणार आहे. ङ्गबफ गटात ताय त्झू यिंग (तैवान), सुंग जी यून (कोरिया), रात्चानोक इंतानोन (थायलंड) व चेन युफेई (चीन) ही धोकादायक चौकडी आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरिन व विश्वविजेत्या नोझोमी ओकुहारा यांनी या स्पर्धेतून अंग काढून घेतले आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या किदांबी श्रीकांत याला मात्र सिंधूच्या तुलनेत कठीण ड्रॉ लाभला आहे. श्रीकांतला ङ्गबफ गटात ठेवण्यात आले असून या गटात डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन, चोव टिएन चेन व शी युकी हे बेभरवशी खेळाडू आहेत. बुधवारी आपल्या पहिल्याच लढतीत त्याला जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या एक्सेलसनशी दोन हात करावे लागणार आहेत.