
स्वित्झर्लंड : बीएमएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेची पहिली विजेती भारतीय खेळाडू ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी पी. व्ही. सिंधू हिने साकारली आहे. अंतिम लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा अवघ्या ३६ मिनिटात पराभव करण्याची किमया सिंधूने साधली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूची कामगिरी देशासाठी अभिमानस्पद आहे अशा शब्दात तिचे अभिनंदन केले आहे.