पणजी
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कोकणी पुस्तकांची विक्री आणि वितरण करणार्या गोव्यातील गोमंतक बुक सर्व्हिस या आस्थापनाने पणजी येथे गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात (तळ मजला, मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिट्यूट इमारत), पुस्तक प्रदर्शन सुरू केलेले आहे. या प्रदर्शनात मुख्यत्वे नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य अकादमी या राष्ट्रीय स्तरावरील प्रकाशक संस्थानी प्रकाशित केलेली भारतातील नामवंत लेखकांची पुस्तके विक्रीस ठेवलेली आहेत. वरील प्रकाशन संस्थांशिवाय राजहंस पॉप्युलर, देशमुख, विश्वकर्मा आदी प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेली नामवंत लेखकांची विविध विषयांची पुस्तके पुस्तक प्रदर्शनात उपलब्ध आहेत.
सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. पुस्तक खरेदीवर १०% पासून २०% सूट दिली जाणार आहे. शिक्षा संस्थांच्या वाचनालयासाठी चार भाषांची पुस्तके एकाच ठिकाणी मिळण्याची सोय.