साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून, नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांच्या लेखनासाठी त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
उपहासात्मक शैलीतील लिखाण त्यांनी एका वेगळ्या शैलीत लिहिले. त्यांची हीच शैली पुढे ‘फॉस मिनिमलिझम’ या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांची दुसरी कांदबरी ‘स्टेंज्ड गिटार’ जी 1985 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांच्या या शैलीची प्रकर्षाने जाणीव होते. जॉन फॉस्से यांचा जन्म 1959 मध्ये नॉर्वे झाला. त्यांनी त्यांचे बहुतेक लिखाण हे नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये
लिहिलेले आहे.