सासष्टीत नवे १६ बाधित

0
128

सासष्टी तालुक्यातील आर्ले, घोगळ, कारगिल दवर्ली व कुंकळ्ळी येथे आणखी १६ कोरोनातबाधित सापडले असून कुंकळ्ळीत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, घोगळ गृहनिर्माण वसाहत मोठी असून तेथे दाटीवाटीने घरे आहेत. तेथे कंटेनमेंट विभाग करून सर्वांची तपासणी करणे गरजेचे आहे. दवर्ली येथे एक बाधित सापडला या आधी तेथे तीन सापडले होते.

कुंकळ्ळीत १२ बाधित
कुंकळ्ळी येथे सोमवारी १६ बाधित सापडले होते. काल आणखी १२ जण बाधित सापडले. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या २८ झाली आहे. यातील बरेच लोक कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत. ते बिहार आदी भागातील असल्याने त्यांचे निवासाचे पत्ते सापडत नसल्याने पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, कुंकळ्ळी येथील नागरिकांनी सर्व कारखाने सरकारने केंटमेंट करावे अशी मागणी केली आहे.

दाबोळी – चिखली येथे
कोरोनाचा तिसरा बळी

गोव्यात कोविडमुळे सोमवारी मध्यरात्री चिखली वास्कोतील आणखी एकाचे निधन झाले. हा कोरोनाचा चिखलीतील तिसरा तर मुरगाव तालुक्यातील एकूण १२ वा मृत्यू ठरला आहे. तर मंगळवारपर्यंत राज्यात एकूण १८ जणांचे बळी गेले आहेत. दाबोळी नाकेली चिखली येथील सदर व्यक्ती ४७ वर्षांचा होता व त्याचे मडगाव कोविड इस्पितळात निधन झाले. त्याला दि. २९ जून रोजी मडगाव कोविड इस्पितळात कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने दाखल करण्यात आले होते. सोळा दिवसांनी त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. सध्या दाबोळी चिखली भागातील दोन पुरुष व एक महिला मिळून तीन जणांचा कोरोनामूळे मृत्यू झाला.

नगरसेवक कोरोनामुक्त
दरम्यान, मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल केलेल्या मुरगावच्या एका नगरसेवकाला काल तब्येत ठीक झालमुळे घरी पाठवण्यात आले आहे. सदर नगरसेवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व त्यांची तब्येत ढासळली होती. त्यामुळे त्यांना त्वरित कोविड इस्पितळात दाखल केले होते.

म्हापशात २२ नवीन रुग्ण

म्हापसा शहरातील कुचेली व शेळपे भागात काल मंगळवारी २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. काल मंगळवारी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालात कुचेली येथे १४ तर शेळपे येथे ८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, कुचेली व शेळपे भाग पालिका, आरोग्य खाते व पोलिसांनी सील केला आहे.