सावईवेरे येथे कारगाडी आणि स्कूटर यांच्यात काल झालेल्या अपघातात स्कूटर चालक संतोष वामन कडेकर यांचे काल निधन झाले.
या अपघातात स्कूटरच्या मागे बसलेली संतोष यांची पत्नी अनिता कडेकर गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी कार चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवला आहे. कार चालक लुमो पालकर याला अटक केली आहे. या प्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.