सावईवेरेचा ‘सख्याहरी’ विजेता

0
103

रौनक क्रिकेटर्स यांच्या सहयोगाने तसेच ज्युनिअर मलिक यांच्यातर्फे कुंभारवाडा-मये येथे घेण्यात आलेल्या तिसर्‍या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावईवेरे येथील ‘सख्याहरी’ क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा स्व. काशिनाथ फाळकर व स्व. शकुंतला फाळकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. महादेव स्पोर्टस् क्लब स्पर्धेतील उपविजेत्या संघाला १५ हजार रुपयांचे पारितोषिक तर उपांत्यफेरीतील रौनक क्रिकेटर्स व सुरज एक्सआय या संघालाही पारितोषिक देण्यात आले. मालिकेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून बाळू (महादेव संघ), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नवसो (सख्याहरी) तर मालिकावीर म्हणून मनोज नार्वेकर (सुरज ११) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा अक्षय फाळकर, सचिव यशवंत फालकर, खजिनदार सर्वेश खांडेकर यांनी आयोजित केली होती.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सेझा गोवाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल बेतकीकर, खोर्ली-तिसवाडीचे सरपंच चंद्रशेखर काणकोणकर, तुळशीदास चोडणकर, मिथुन वैद्य, समीर देसाई, प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.