सावंत सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले : गिरीश

0
90

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार हे भ्रष्ट व असंवेदनशील असून सत्तेवर आल्यापासून नाकर्तेपणामुळे या सरकारने गोव्याला दिवाळखोरीकडे नेल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

सद्यःस्थितीत राज्याची एकूण आर्थिक तूट राज्याच्या एकूण घरगुती उत्पादनाच्या तुलनेत २०२०-२१ वर्षासाठी ५.३ टक्के एवढी राहणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ती सर्वांत जास्त आहे. देशातील इतर राज्यांची एकूण आर्थिक तूट २.८ टक्के असून प्राथमिक एकूण घरगुती उत्पादनांची तूट ९.३ टक्के आहे. इतर राज्ये व संघप्रदेशात ती सरासरी १.१ टक्के एवढी आहे, असा दावा चोडणकर यांनी केला आहे.

गोव्याने घेतलेली जवळजवळ ५२ टक्के कर्जे ६ वर्षांनी वृद्धिंगत होत असून देशातील इतर राज्यांची सदर टक्केवारी ४५ टक्के आहे. दुर्दैवाने भाजप सरकारने कर्ज काढण्याचा सपाटाच लावला आहे. आज प्रत्येक गोमंतकीयाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला असल्याचे ते म्हणाले. गोव्याची आर्थिक तूट वाढतच आहे. महसूल व खर्च यांचा ताळमेळ राखणे सावंत सरकारला जमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.