सावंतवाडीत दुरांतो एक्स्प्रेस घसरली

0
136

>> कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, कोणतीही जीवितहानी नाही

सावंतवाडी येथे काल गुरूवारी सकाळी दुरांतो एक्सप्रेस रूळावरुन घसरली. रूळाचे काम सुरू असल्याने रेल्वेचा वेग प्रति तास दहा ते वीस किलोमीटर एवढाच होता. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला मात्र रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेतील प्रवासी सुखरूप असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठोवण्यात आला आहे. पेडणे येथून रेस्क्यू इंजिन व व्हॅन घटनास्थळी दाखल झाली असून रेल्वे रूळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. घटनास्थळी रेल्वेचे क्षेत्रीय अभियंते बाळासाहेब घाडगे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस दाखल झाले होते.

काल गुरुवारी कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी-झाराप दरम्यान दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. ट्रेन क्र. १२२४, एर्नाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस गुरुवारी दुपारी ३.०३ वा. सावंतवाडी-झाराप रेल्वे स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या. मात्र या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे अधिकार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वाहतूक केव्हा सुरू होईल याबाबत अधिकार्‍यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी ७ ते ८ तासांचा वेळ लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रवाशांना रेल्वे वाहतूकीबद्दल अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेकडून ०२२-२७५८७९३९ हा क्रमांक जारी करण्यात आला असून त्यावर चौकशी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ुुु.ज्ञेपज्ञरपीरळश्रुरू.लेा या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती मिळू शकते असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, ‘दुरांतो एक्स्प्रेस’चे इंजिन सुमारे ४ तासांनंतर रुळावर आणण्यात यश आले असून ७.२० पासून कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असून अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.