सायना, सिंधू दुसर्‍या फेरीत

0
111

सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांनी काल बुधवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत ‘डॉ. अखिलेश दासगुप्ता इंडिया ओपन सुपर ५००’ बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरी गटातून दुसरी फेरी गाठली. ३५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत एच.एस. प्रणॉय याला मात्र पायाच्या दुखापतीमुळे पहिल्याच फेरीत पराजित व्हावे लागले.

महिला एकेरीत चौथ्या मानांकित सायनाने डेन्मार्कच्या सोफी होलमबोए दाह्ल हिचा २१-१५, २१-९ असा ४१ मिनिटांत फडशा पाडला. विद्यमान विजेत्या सिंधूलादेखील विजयासाठी अधिक घाम गाळावा लागला नाही. तिनेदेखील डेन्मार्कच्या नतालिया कोच रोहडे हिला २१-१०, २१-१३ असे हरविले. दुसर्‍या फेरीत सायनाचा सामना डेन्मार्कच्या लिन हिजमार्क कासेरफेल्ट हिच्याशी होणार आहे. तर सिंधूला बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरी हिच्याशी दोन हात करावे लागतील.
पुरुष एकेरीत प्रणॉयला दुखापतीमुळे नैसर्गिक खेळ करता आला नाही. त्याला श्रेयांस जैसवालकडून २१-४, २१-६ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीतील पहिल्या फेरीतील अन्य एका महत्त्वाच्या लढतीत साईप्रणिथने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्यपदक विजेत्या राजीव ओसेफला २१-११, १७-२१, २१-१७ असा हरविले.

 

अन्य महत्त्वाचे निकाल ः पहिली फेरी ः महिला एकेरी ः आकार्षी कश्यप वि. वि. अनुरा प्रभुदेसाई १४-२१, २१-१८, २१-१४, रसिका राजे पराभूत वि. रत्चानोक इंतानोन ४-२१, ६-२१, गड्डे रुत्विका शिवानी वि. वि. अमाली हटर्‌‌झ २१-१७, २१-१०
पुरुष दुहेरी ः मनू अत्री व सुमीथ रेड्डी वि. वि. आदर्श कुमार व जगदीश यादव २१-७, २१-१३, मिश्र दुहेरी ः प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी वि. वि. हफीझ फैझल व ग्लोरिया इमान्युएल १६-२१, २१-१७, २१-१७, विघ्नेश देवळेकर व हरिका वेलुदुर्ती पराभूत वि. योगेंद्रन कृष्णन व प्राजक्ता सावंत १७-२१, १०-२१.