सायना-सिंधू आमनेसामने ?

0
139

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत भारताची स्टार दुकली सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.

पाचवी मानांकित सिंधू जपानच्या अया ओहोरी हिच्याविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे तर सायनासमोर जपानच्याच सायाका ताकाहाशी हिचे आव्हान असेल. दोघी भारतीयांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास दुसर्‍या फेरीत त्यांना एकमेकांविरुद्ध झुंजावे लागणार आहे. सायनाविरुद्ध सिंधूचा रेकॉर्ड १-३ असा खराव आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये झालेले चारही सामने सरळ गेममध्ये निकाली लागले आहेत. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सिंधूने सायनाचा अनेक वेळा पराभव केलेला असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सायनाच वरचढ ठरली आहे. अन्य भारतीयांमध्ये किदांबी श्रीकांत, शेसर हेसर रुस्तावियो या इंडोनेशियन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.

साई प्रणिथसमोर चीनच्या आठव्या मानांकित शी युकी असेल. पारुपल्ली कश्यप व एच.एस. प्रणॉय ही दुकली अनुक्रमे अँथनी सिनिसुका गिनटिंग व जोनाथन क्रिस्टी या स्थानिक खेळाडूंविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करतील.