साडे बारा हजार रुग्ण होम आयसोलेशनखाली

0
301

राज्यात कोरोनाबाधितांकडून होम आयसोलेशन घेण्याचे प्रमाण वाढत असून सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ४८५ रुग्णांनी काल होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे होम आयसोलेशनखालील रुग्णांची एकूण संख्या १२,४९२ एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन २३० रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

राज्यात नवे ३२४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८,७५३ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५६६७ झाली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत ११४५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील ३२४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोविड स्वॅबच्या तपासणीचे प्रमाण कमी असल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.

राज्यातील कोरोनाचे आणखी ४२९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी ७९.०३ एवढी आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२,७२६ झाली आहे.

राज्यात कोरोनाचे आणखी ९ बळी
राज्यात कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी ९ रुग्णांचा मृत्यू काल झाला. राज्यातील कोरोना बळींची संख्या ३६० झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ६ जणांचा, तर, मडगाव येथील ईएसआय इस्पितळात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.