गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने गिरी येथे छापा टाकून १३.६२ लाखांचे ड्रग्स काल जप्त केले. या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले असून, त्याचे नाव अनुलिग्वोह चीबुएझे (३६) असे आहे. त्याच्याकडून एलएसडी लिक्विड व कोकेन हा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला.