साडेचार वर्षीय मुलाचे बांबोळी येथून अपहरण

0
2

बांबोळी येथून साडेचार वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले आहे, अशी तक्रार आगशी पोलीस स्थानकात काल नोंद करण्यात आली. अपहरणाची ही घटना 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 ते 5.40 या वेळेत घडली आहे. आगशी पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.