सागरमाला अंतर्गत सर्व जलमार्गांचे आधुनिकीकरण

0
11

>> केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि दूरदृष्टीखाली आणि सागरमाला आणि गतिशक्ती उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील सर्व बंदरे आणि जलमार्गांचे आधुनिकीकरण, डिजिटायझेशन आणि अपग्रेडेशन होईल. एमपीएसाठी मैलाचा दगड असलेला आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्यास मदत करेल असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग आणि आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.

मुरगाव बंदर प्राधिकरणात जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल्सच्या विकासासाठी पायाभरणी (शिलान्यास) मंत्री श्री. सोनोवाल यांच्या हस्ते केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, पर्यटन राज्यमंत्री रोहन खवंटे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर आणि संकल्प आमोणकर याची उपस्थिती होती.

एमपीएने पोर्ट रेल्वे बायणा येथे मालवाहतूक सुलभ करण्यासाठी अप रॅम्प टू फ्लाय ओव्हर बांधण्याची योजना जाहीर केली. न्यू मंगळूर बंदर प्राधिकरणच्या आगामी प्रकल्पांचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. यात मल्ल्या गेटचे आधुनिकीकरण, घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे बांधकाम, द्विभाषिक वेबसाइटचे डिझाइन आणि विकास यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाला पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या पर्यटन पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत आणि सागरमाला योजनेअंतर्गत बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने संयुक्तपणे निधी दिला आहे.

कार्यक्रमस्थळी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एमपीए आणि एनएमपीएचे अध्यक्ष डॉ. वेंकट रमणा अक्कराजू यांनी, सरकारच्या या योजनेमुळे मुरगाव बंदराची कार्गो हाताळणी क्षमता वाढेल आणि पर्यटन उद्योगाला चालना मिळेल असे सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, दाबोळी विमानतळ आगामी मोपा विमानतळासोबत एकाच वेळी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली. यावेळी मंत्री श्रीपाद नाईक यांनीही विचार मांडले.