साखळीत भाजपचा विजय निश्चित

0
8

मुख्यमंत्री, तानावडेंचा विश्वास, भाजपचे उमेदवार जाहीर

साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत दहाही उमेदवारांची घोषणा काल प्रदेश अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत केली. या निवडणुकीत बारा प्रभागांतून एक भाजप उमेदवार रियाज खान (प्रभाग आठ) बिनविरोध निवडून आले असून इतर दहा प्रभागांत भाजपला चांगला पाठिंबा मिळत असून भाजपचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास श्री. तानवडे यांनी व्यक्त केला. भाजपचे डबल इंजिन सरकार प्रत्येक घरात समृद्धीसाठी कार्यरत आहे. जनतेने भाजपला मोठा पाठिंबा दिलेला असून यावेळी साखळीत भाजप पूर्ण सत्ता काबीज करणार असल्याचा दावा तानवडे यांनी केला.

भाजप उमेदवार
प्रभाग एक ः यशवंत माडकर
प्रभाग दोन ः निकिता नाईक
प्रभाग तीन ः सिद्धी परब
प्रभाग चार ः रश्मी देसाई
प्रभाग पाच (बिनविरोध)
प्रभाग सहा ः विनंती पार्सेकर
प्रभाग सात ः ब्रह्मानंद देसाई
प्रभाग आठ ः रियाज खान (बिनविरोध)
प्रभाग नऊ ः आनंद काणेकर
प्रभाग दहा ः दयानंद बोर्येकर
प्रभाग अकरा ः दीपा जल्मी
प्रभाग बारा ः अंजना कामत.

साखळीत काँग्रेस गायब ः मुख्यमंत्री
साखळीत काँग्रेसकडे उमेदवार, कार्यकर्तेच नाहीत. त्यामुळे एकाच घरातून वडील, आई, पत्नी असे उमेदवार देण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. भाजपने पालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार दिले असून भाजप पूर्ण बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
विकास व सरकारी योजना घरोघरी नेताना प्रत्येक घरात समृद्धी यावी हा संकल्प घेऊन आमचे काम सुरू आहे. साखळी शहर आदर्श करण्यासाठी आम्ही अनेक सुविधा बहाल केल्या आहेत. यावेळी दहाही प्रभागातून भाजप मुसंडी मारणार असा विश्वास पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.