सां जुझे आरियाल नेसाय येथे काल शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका नवीन मद्य उत्पादक कारखान्यास आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत लाखो रुपयांची हानी झाल्याचे वृत्त आहे. आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुर केला. मात्र तोवर या आगीत संपूर्ण कारखानाजळून खाक झाला. रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी आग धुमसत होती. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते कारण स्पष्ट झालेले नाही.