सोनारवाडा सांतीमळ राय येथे खगेश्वर सबर (40) हा तरूण एका खोलीत मृतावस्थेत सापडला. पोलीस तपासात त्याचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचे उघड झाले आहे. खंडेश्वर हा ओरिसा येथाल असून सांतीमळ राय येथे गोल्डन हाऊस चाळीत एका भाड्याच्या खोलीत तो व आणखी दोघे मिळून तिघेजण राहत होते. तिघेही ओरिसा येथील आहेत. खगेश्वर सबर नावाचा हा कामगार राय गावातील सोनारवाडा येथे राहायचा. सोनारवाडा येथील चाळीत ओडिसा, झारखंड येथून आलेले अनेक कामगार राहतात. या प्रकरानंतर त्या खोलीतील इतर दोघे बेपत्ता झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ठेवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.