सांतिनेजमध्ये अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

0
1

सांतिनेज पणजी येथे सोमवारी रात्री दोन दुचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. सांतिनेज पणजी येथील दुकळे हेवन इमारतीजवळ दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातानंतर एका दुचाकी चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अजय राजभर (24, ताळगाव, मूळ उत्तर प्रदेश) या दुचाकी चालकाचे इस्पितळात निधन झाले आहे. पणजी पोलीस पळून गेलेल्या दुचाकीचालकाचा शोध घेत आहेत.