ओल्ड गोवा पोलिसांनी सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला आणि सोनूू यादव या युवकाच्या मृत्यू प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोघा अल्पवयीनांचा समावेश आहे. दरम्यान, ७ जणांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने काल दिला.
ही घटना शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली असून पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी ९ जणांना ताब्यात घेतले. त्यात दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे. इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला करणार्यांमध्ये मयत सोनू यादवचा समावेश होता. संशयित आरोपी मार्सोलीन डायस याच्याजवळून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
संशयिताकडून वस्तू ताब्यात
ओल्ड गोवा पोलिसांनी संशयित आरोपीकडून हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काही वस्तू सांतइनेज पणजी येथून काल ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या निवासस्थाना जवळील निर्जन स्थळातून काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.