कुयणामळ, सांगे येथील शांताराम शाणू शिरोडकर खूनप्रकरणी सांगे पोलिसांनी काल रात्री उशिरा दोघा संशयितांना अटक केली. पोलिसांनी रात्री पावणेअकराच्या दरम्यान शांताराम यांचा भाऊ रवीदास शिरोडकर (७३) व पुतण्या जय शिरोडकर (३९) या दोघांना संशयित म्हणून अटक केली आहे. गेल्या रविवारी शांताराम यांच्या काजू बागायतीत ९० टक्के जळलेल्या अवस्थेत एका वृद्धाचे प्रेत सापडले होते. त्या जागी शांताराम यांच्या चपप्ला, घराची चावी, कोयता व टोपी सापडली होती. बागायतीत साफसफाई करण्यास गेलेले शांताराम बेपत्ता असल्याने तो मृतदेह त्यांचा असल्याचा संशय आहे.