राज्यातील सांगे विभागाने मोसमी पावसाच्या इंचाचे शतक काल पूर्ण केले. राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम असून, चोवीस तासांत 3.23 इंच पावसाची नोंद झाली. सांगे येथे आत्तापर्यंत 100.62 इंच इतका पाऊस पडला आहे, तर राज्यात आत्तापर्यंत 89.01 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या 27 जुलैपर्यंत काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक भागात अजूनही पूरग्रस्त स्थिती कायम आहे. हवामान विभागाने 26 आणि 27 जुलै या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 28 आणि 29 जुलैसाठी एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अंजुणे येथील धरण 75 टक्के भरले आहे. या धरणातील पातळी खूपच कमी झाली होती. राज्यातील साळावली, पंचवाडी, आमठाणे आणि गावणे ही चार धरणे यापूर्वीच भरली आहेत, तर चापोली धरण 94 टक्के भरले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे