गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फाशी झालेल्या एकुण सहा जणांच्या दयायाचिका फेटाळून लावल्या. यात नोयडा, उ.प्र. येथे गाजलेल्या निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोली याचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील रेणुकाबाई व सीमा या बहिणींचाही समावेश आहे. त्यांच्यावर अनेक मुलांच्या अपहरण व क्रुर हत्यांचा आरोप आहे. महाराष्ट्रातील राजेंद्र प्रल्हादराव वासनीक याचाही अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तो दोषी होता. आपली पत्नी व पाच मुलांना ठार मारणार्या मध्य प्रदेशच्या जगदीशची फाशीही नक्की केली आहे. आसामच्या होलीराम बोरदोई याचाही अर्ज फेटाळण्यात आला. त्याने दोघांना जीवंत जाळले होते तर अन्य एकाचा खून केला होता.