‘सहारा’वर छाप्यात १३५ कोटींचे सोने, रोकड जप्त

0
115

करचुकवेगिरीप्रकरणी आयकर खात्याने सहारा उद्योग समूहाच्या दिल्ली व नोयडा येथील कार्यालयांवर छापा टाकून १३५ कोटी रुपयांची रोकड व सोने जप्त केले. जप्त केलेले सुवर्णालंकार सुमारे १ कोटी रुपये किमतीचे आहेत. दरम्यान, सहाराशी संपर्क केला असता त्यांनी हा सर्व पैसा कायदेशीर असल्याचे सांगितले.